माती परीक्षण

माती परिक्षण मातीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासून त्यानुसार खतांच्या मात्रा देणे नेहमीच फायदेशीर असते, मातीतून 1 घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जमिनीचा उतार, रंग, खोली, पोत याचा सर्वसाधारण विचार करून प्रत्येक विभागातून प्रतिनिधिक नमुना तंत्ररित्या नमुना घ्यावा. जमिनीच्या पृष्ठभागावरील काडीकचरा, दगड गोटे बाजूला करून ३० X ३० X ३० से.मी. आकाराचा ख मिलन खड्यातील पूर्ण माती बाजुला काढून त्यानंतर खड्याच्या चारही बाजूची २ से.मी. जाडीची माती खुरप्याच्या सहाय्याने वरपासून खालपर्यंत खरडून घ्यावी. असे एक एकरातून मातीच्या प्रकारानुसार एकाच प्रकारच्या मातीचे ७-८ ठिकाणावरून मातीचा नमुना घेण्यासाठी खुरपे, गिरमीट, घमेले इ. साहित्याचा वापर करावा. सुक्ष्म अन्नद्रव्ये पृथ्थकरणासाठी टोकदार लाकडी खुटी प्लास्टीकचे चमेल ॐ वापरावे. त्यासाठी धातूचे कोणतेही साहित्य वापरु नये. माती एकत्र करून सावलीत वाळवून, एक किलो मातीचा नमुना प्रयोगशाळेत इ. तपासणीसाठी पाठवावा. माती परीक्षणासाठी प्रातिनिधिक नमुना घेताना घ्यावयाची काळजी शेतात जनावरे बसण्याच्या जागा, खत व कचरा टाकण्याच्या जागा, झाड विहिरींचे किंवा शेतीचे बांध, दलदलीची जागा, झाडाखालची जागा, उकिरडा इत्यादी जागेतून मातीचे नमुने घेऊ नयेत. मातीचा नमुना साधारणपणे पिकाची काढणी झाल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा, शेतात पीक असल्यास दोन ओळीतील जागेतून १. नमुना घ्यावा. ३. शेतात रासायनिक खते टाकली असल्यास २-२॥ महिन्याच्या आत मातीचा नमुना घेऊ नये. ४. निरनिराळ्या प्रकाराच्या जमिनींचे किंवा निरनिराळ्या शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत. ५. रासायनिक खताच्या रिकाम्या पिशव्या मातीचा नमुना घेण्यासाठी वापरू नयेत. ६. मातीचा नमुना घेताना कृषि सहाय्यक किंवा ग्राम विस्तार अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यावे. मातीचा नमुना खालील माहितीसह प्रयोगशाळेत पाठवावा १) शेतकऱ्याचे नांव व पूर्ण पत्ता व दूरध्वनी क्रमांक ४) शेतीचा प्रकार बागायत / कोरडवाहू २) नमुना घेतल्याची तारीख (५) ओलिताचे साधन ३) सर्व्हे नंबर / गट क्रमांक ६) जमिनीचा निचरा (चांगला /मध्यम/कमी) ७) जमिनीचा प्रकार (वाळू / पोयटा / चिकणमाती / क्षारयुक्त / विम्ल / चुनखडीयुक्त) ८) जमिनीचा उतार (जास्त / मध्यम / सपाट) ९) जमिनीची खोली (उथळ- २५ सें.मी., मध्यम- २५.५० सें.मी. खोल ५०-१०० सें.मी., अतीखोल - १०० से.मी. पेक्षा जास्त) १०) मागील हंगामात घेतलेले पीक, त्यांचे उत्पादन ११) वापरलेली खते व त्यांचे प्रमाण १२) पुढील हंगामात घ्यावयाची पिके आणि त्यांचे वाण
yek number
nice ……
nice mahiti……..sir
👌