पीकवाढीची मूलद्रव्य

पीकवाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये

         कोणतेही पीक असो ,फळझाड असो अथवा एतर कोणत्याही वनस्पती असो त्यास सदृढ वाढीसाठी ऐकून १७ मूलद्रव्य आवश्यकता असते .जे आपण शेंद्रिय रासायनिक हिरवळीची अशा विविध खतांद्वारे पिकास देत असतो.

        प्रमुख मूलद्रव्य-

                    कार्बन ,हायड्रोजन ,ऑमूलद्रव्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, सल्फर,कॅल्शियम, मॅग्नेशियम. 

   वर्गीकरण:

 

मुख्य अन्नद्रव्ये- 

       नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम.

 

दुय्यम अन्नद्रव्ये –

          सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम. यामधील कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन ही मूलद्रव्ये वातावरणातून हवा, पाणी जमिनीतून झाडास मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. बाकीची मूलद्रव्ये आपण रासायनिक, जैविक खतांद्वारे पिकास उपलब्ध करून देतो.

 

कमी प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्ये :

        बोरॉन, क्लोरीन, तांबे,

 

लोह, मॅग्ननीज, मोलिब्डेनम आणि जस्त प्रमुख अन्नद्रव्यांची कार्ये :

 

नत्र या अन्न्द्रव्यामुळे वनस्पतीस भरपूर पाने येतात, वाढ जोमदार आणि जलद होते, पिकांचा फुटवा सुधारतो आणि त्यामुळे उत्पादनात हमखास वाढ होते, प्रकाश संश्लेषण वाढते. धान्यातील तसेच भाजीपाला व फळभाज्या यातील प्रथिनांचे प्रमाण वाढून कृषी मालाचा दर्जा सुधारतो.

 

स्फुरद : वनस्पतींच्या जैव-रासायनिक क्रियेत स्फुरदला मोलाचे स्थान आहे. या अन्नद्रव्यामुळे प्रामुख्याने मुळांची वाढ जलद आणि जोमदार होऊन, वनस्पतींची पाणी तसेच इतर पोषक अन्नद्रव्ये शोषणाची क्षमता आणि क्रिया वाढते. पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांच्या निर्मिती कार्यास यामुळे चालना मिळते. या अन्नद्रव्यांमुळे गळीत धान्यात तेलाचे प्रमाण तर तृण आणि कडधान्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते. नत्रामुळे प्रामुख्याने वनस्पतींच्या शाखीय वाढीस चालना मिळते, तर स्फुरदमुळेपुनर्निर्मितीच्या क्रिया बुद्धिं नत्र आणि स्फुरदच्या पुरेशा पुरवठ्यामुळे वनस्पतींची अवर्षण काळात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमतादेखील वाढते.

 

पालाश : वनस्पतीच्या जैविक क्रियेत पालाश महत्त्वाचे कार्य बजावते. पालाशमुळे वनस्पतींच्या सालींना, खोडांना तसेच पानांना कणखरपणा येतो. त्यामुळे पीक जमिनावर न लोळता, जोमाने उभे राहते. पीक, रोग आणि किडींना बळी पडत नाही. जमिनीतील कमी प्रमाणात उपलब्ध असलेला ओलावा, क्षारयुक्तता, जास्त थंड आणि ढगाळ हवामान अशा विपरीत परिस्थितीमध्येसुद्धा पीक कणखरपणे उभे राहून, अधिकाधिक उत्पादनाचा टप्पा गाठण्यासाठी पालाश या अन्नद्रव्यास अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या द्रव्यामुळे प्रामुख्याने पिष्टमय पदार्थांची निर्मिती आणि त्यांचे साखरेत रूपांतर होणे या क्रिया गतिशील होतात.

 

पीकनिगा –कॅल्शियम:

 कॅल्शियम दुय्यम अन्नद्रव्ये : हे अन्नद्रव्य वनस्पतींच्या पेशी आवरणात कॅल्शियम पेक्टेट या रूपात असते. मुळांच्या योग्य कार्यासाठी आणि पेशी विभाजनाच्या वाढीसाठी हे अन्नद्रव्य आवश्यक असते, वनस्पतींमध्ये सेंद्रिय आम्ले तयार होत असतात आणि त्यांचे प्रमाण जास्त वाढल्यास ते अपायकारक ठरते. ही आम्लता कमी करण्याचे काम कॅल्शियमद्वारे घडवून आणली जाते.

 

मॅग्नेशियम : कॅल्शियमप्रमाणेच हे अन्नद्रव्य विकरांमुळे होणान्या क्रिया गतिमान ठेवण्यास उपयुक्त ठरते. चुनखडीच्या जमिनीत वाढणान्या लिंबूवर्गीय झाडांना मॅग्नेशियमची कमतरता जास्त जाणवते.

 

गंधक कडधान्ये तसेच तेलवर्गीय पिकांमध्ये अनुक्रमे प्रथिनांचे आणि तेलाचे प्रमाण या अन्नद्रव्यामुळे वाढते. नत्र स्थिरीकरण जास्त होते, शोषण जवळजवळ स्फुरदएवढेच केले जाते, कृषी मालाचा दर्जा सुधारतो. म्हणून नत्र, स्फुरद आणि पालाशनंतर चौथे मुख्य अन्नद्रव्य म्हणून अलीकडे गंधकाचा उल्लेख केला जातो

 

1 thought on “पीकवाढीची मूलद्रव्य”

  1. आनंदा लाड

    सर तुम्ही दिलेली माहिती खरोखर शेतकऱ्यांसाठी चांगली माहिती आहे तसेच तुम्ही दिलेली माहिती शेतकऱ्यांना खूप महत्त्वाचे आह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top