फुलशेती……

फुलशेती

      महाराष्ट्र राज्यात सन २०१९ -२० मधील एकूण फुल पिकाखालील १५००० हेक्टर क्षेत्रापैकी २९ टक्के क्षेत्र झेंडू (३१५० हे.) आणि ३४ टक्के क्षेत्र गुलाब (४२३० हे.) या फुलांखाली आहे. महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रापैकी पश्चिम महाराष्ट्रात गुलाबाखाली ६४ ठक्के क्षेत्र तर झेंडूखाली ५९ टक्के क्षेत्र आहे.

 

    गुलाव

 

      जमीन

 

५० ते ६० से.मी. खोलीची, पाण्याचा निचरा होणारी, सामू ५.५ ते ६.० असलेली निवडावी. : माती शेणखत वाळू (२०११) या प्रमाणात मिसळून १० से.मी. रुंदीचे २० ते ४५ से.मी. उंचीचे गादीवाफे ३ टक्के फॅर्मिलडीहाईड या द्रावणाने निर्जंतूक करावेत. पूर्व मशागत

सुधारित वाण

फर्स्ट रेड, नोबलीस, स्काय लाईन, कॉनफिटी, टिनाके, बियांका, टेम्टेशन, पॅशन, गोल्डन स्ट्राईक, पोलो

लागवडीची वेळ

3 जुलै- ऑगस्ट

 

लागवडीचे अंतर

 

४०x२० सें.मी.

 

खत मात्रा

 

५ ते १० किलो शेणखत, ३०:३०:२० ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश / चौ.मी. लागवडीच्या वेळी त्यानंतर ४००:२०० २०० मिलीग्रॅम नत्र, स्फुरद पालाश प्रति झाड प्रति आठवडा द्यावे,

 

आंतर मशागत

 

: वेळोवेळी वाळलेली, रोगट पाने काढावीत. तसेच गादीवाफे खुरपून भुसभुशीत ठेवावेत.

 

पाणी व्यवस्थापन

ठिबक सिंचनाद्वारे पिकाच्या वाढीनुसार पाणी द्यावे.

 

पीक संरक्षण

 

: शेंडेमर या रोगाच्या नियंत्रणासाठी छाटलेल्या भागास १० टक्के बोर्डोपेस्ट लावावी. छाटणीनंतर लगेच कार्बेन्डॅझिम ०.१ टक्का या बुरशीनाशकाची फवारणी करावी. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी डायफिनाल ०.०५ टक्के या बुरशीनाशकाची दर आठ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. फुलकिडे व पांढरी माशी या किडीच्या नियंत्रणासाठी इमॅडॉक्लोप्रिड ०.५ मिली किवा असिटामिप्रिड ०.४ मिली किंवा अॅक्टीन ०.४ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. या लाल कोळी किडीच्या नियंत्रणासाठी डायकोफॉल

 

काढणी व उत्पादन :

 

१.५ मिली किंवा अमेक्टीन ०.४ मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लागवडीनंतर सहा महिन्यांनी फुले काढणीस येऊन प्रति चौ. मी. प्रति वर्षे १९० ते २३० फुले मिळतात.

 

निशिगंध

 

जमीन

 

: मध्यम ते हलकी, पाण्याचा चांगला निचरा होणारी

 

: आडवी-उभी नांगरट आणि दोन कुळवाच्या पाळ्या.

 

: सपाट वाफ्यात अथवा सरी वरंब्यावर

 

सुधारित वाण

: फुले रजनी, श्रृंगार, प्रज्वल, सुहासिनी आणि वैभव,

 

लागवडीची वेळ

 

एप्रिल- मे.

 

लागवडीचे अंतर

 

३० x ३० सें.मी.

 

कंद प्रक्रिया

 

: सर्वसाधारण ३० ग्रॅ. वजनाचे पूर्ण विश्रांती झालेले कंद ०.३ टक्के कॅपटॉप या बुरशीनाशक द्रावणात २०मिनिटे बुडवावेत.

 

खत मात्रा

 

: हेक्टरी ४०-५० टन शेणखत, २०० किलो नत्र, १५० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाश. स्फुरद व पालाश तीन समान हप्त्यात विभागून द्यावे. पहिला हप्ता लागवडीच्या वेळी द्यावा व नंतर दुसरा ४५ दिवसांनी, तिसरा ९० दिवसांनी द्यावा.

 

आंतरमशागत

 

: वर्षभरात चार ते पाच खुरपण्या द्याव्यात.

 

पाणी व्यवस्थापन

: गरजेनुसार उन्हाळ्यात ३-४ दिवसांनी, हिवाळ्यात ७ ते ८ दिवसांनी आणि पावसाळ्यात १० ते १२दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

पीक संरक्षण

: खोड कुज या रोगाच्या नियंत्रणासाठी कॅप्टन ०.३ टक्के किंवा बेनोमिल ०.२ टक्के यापैकी एका बुरशीनाशकांची फवारणी तसेच झाडाच्या मुळाशी दर एक महिन्याच्या अंतराने द्रावण ओतावे. पानावरील ठिपके व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी झायरम ०.३ टक्के किंवा डायथेन एम ४५ ०.२५ टक्के यापैकीएका बुरशीनाशकाची दर १५ दिवसाच्या अंतराने प्रादुर्भाव होताच फवारणी करावी..

 

 

लागवडीनंतर तीन ते चार महिन्यांनी फुलदांडे काढण्यास येतात. त्यांची पुढे आठ ते नऊ महिने काढणी चालू राहते. साधारणतः ७ ते ८ लाख फुलदांडे किंवा ७ ते ७.५ टन सुटी फुले प्रति हेक्टरी मिळतात.

1 thought on “फुलशेती……”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top